Chhatrapati Sambhaji Maharajanchi Rajneeti – छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती

Chhatrapati Sambhaji Maharajanchi Rajneeti is written by Dr. Kedar M. Phalke and Foreworded by Shri. Pradip Rawat. Author ha given detailed study of Reign, politics, Land revenue system, Military system, Economy and business during the 9 years period of Chhatrapati Sambhaji Maharaj.

Original price was: ₹950.00.Current price is: ₹900.00.

In stock

Description

शिवछत्रपतींच्या मृत्य औरंगजेब पाच लक्ष मुघलांची फौज घेऊन संपूर्ण हिंदुस्थान जिंकण्याच्या हेतूने दख्खनमध्ये उतरला. त्याच्याशी अव्याहतपणे सामना करीत मराठ्यांच्या राज्याचे संरक्षण करण्याचे कर्तव्य संभाजी महाराजांनी प्राणपणाने पार पाडले. संभाजी महाराजांनी आपल्या नऊ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत राज्याच्या सर्व आघाड्यांवर लक्ष देत प्रजेच्या रक्षणाबरोबर तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न केला. महाराजांची राजनीती ही वेगनेगळ्या राजनैतिक, प्रशासकीय, आर्थिक, लष्करी अशा पैलूंनी व्यापलेली आहे. संभाजी महाराजांच्यी राजनीती हा व्यापक विषय आहे. डॉ. केदार फाळके यांनी संभाजी महाराजांच्या राजनीतीचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिले आहे. संभाजी महाराजांच्या काळातील साधनांची खूप कमी प्रमाणात चिकित्सा झाली आहे. महाराजांच्या कारकीर्दीतील राजकीय घडामोडी आणि युद्धशास्त्रीय घटनांव्यतिरिक्त इतर घटकांचा कमी प्रमाणात अभ्यास झाला आहे. संशोधनाच्या दुर्लक्षित झालेल्या पैलूंचा अभ्यास करण्यावर डॉ. फाळके यांनी या पुस्तकामध्ये मुख्य भर दिला आहे. या पुस्तकामध्ये प्रामुख्याने संभाजी महाराजांच्यी राजनीती, राज्यकारभार, महसूल व्यवस्था, लष्करी व्यवस्था, अर्थव्यवस्था, व्यापार आणि उद्योगधंदे, चलनव्यवस्था, वेतने आणि इनामे, धार्मिक धोरणे आणि बलिदान अशा विविध घटकांचा समावेश झाला आहे.

Additional information

Weight 950 g
Dimensions 22.5 × 1 × 28.5 cm
Book Author

First Edition

2020

Format

Hardcover

Language

Marathi

Pages

282

ISBN

978-81-945171-5-3

You may also like…