Visarlele Pune – विसरलेले पुणे

Although ‘Pune City’ is the central theme of this book, the specific subjects explored within it are quite distinct. The book delves into a variety of topics—things that have faded so completely from memory that people no longer retain even a faint recollection of them.
In a sense, the focus is not merely on ‘what is missing,‘ but rather on ‘what has been lost’ and ‘what has slipped into oblivion.‘ It chronicles numerous elements that were once commonplace for the older generation but have since vanished entirely—leaving no trace in the memories of the younger generations. One could well regard this as a retrospective journey through the history of the last seventy-five years of Pune city.
Someone needs to share these stories with young generation. Driven by this very thought, author decided to document, in detail, the past experienced and lived by generations in the last century.
Readers will find these old memories of Pune City compiled by Dr. Avinash Sowani in this Visarlele Pune Book.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹1,500.00.Current price is: ₹1,200.00.

In stock

Description

पुणे शहर ही जरी या पुस्तकातील मध्यवर्ती संकल्पना असली तरीही त्यातील विषय मात्र थोडे वेगळे आहेत. ज्यांविषयींच्या पुसटशा आठवणीही लोकांच्या स्मरणात उरलेल्या नाहीत अशा अनेकविध गोष्टींचा उहापोह या पुस्तकात केलेला आहे.
एका दृष्टीने, ‘काय हरवले?’ यापेक्षाही ‘काय गमावले?’ ‘काय काय विस्मृतीत गेले?’ हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुन्या पिढीच्या सर्रास वापरात असलेल्या परंतु कालौघात आपले अस्तित्व साफ नामशेष झालेल्या, तथापि नव्या पिढ्यांच्या स्मरणातही नसलेल्या अशा अनेक बाबींचा लेखाजोखा यात मांडलेला आहे. गेल्या पाऊणशे वर्षांपूर्वीच्या इतिहासाची ही एका परीने उजळणीच आहे असे मानण्यास हरकत नाही.
सुमारे ६०-७० वर्षांपूर्वीचे पुणे जर कालौघात हरवून जात असेल, विस्मरणात जात असेल तर आजच्या नवीन पिढीतील मंडळींना ते कसे समजणार?
तथापि, हे कुणीतरी त्यांना मुद्दाम सांगायला पाहिजे आणि केवळ याच विचाराने लेखक डॉ. अविनाश सोवनी यांनी ठरविले की, त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या मागील पिढ्यांनी गेल्या शंभर वर्षांत अनुभवलेल्या, प्रत्यक्ष जगलेल्या त्या भूतकाळाबद्दलची कहाणी विस्तृत रूपात लिहून वाचकांसमोर मांडायची.
वाचकांना, गतकाळातील या आगळ्यावेगळ्या संकल्पना निश्चितच भावतील अशी अपेक्षा आहे आणि याच हेतूने विसरलेले पुणे हे पुस्तक त्यांच्या हाती देताना ल्रेखाकाला नक्कीच आनंद वाटत आहे.

Additional information

Weight 950 g
Dimensions 18.5 × 5 × 22.5 cm
Book Author

First Edition

2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

584

Publisher

Merven Technologies

ISBN

978-93-90129-09-6

You may also like…