Saath divas Sahyadriche – साठ दिवस सह्याद्रीचे
Saath divas Sahyadriche is a travelogue of author Shripad Hirlekar in Sahyadri ranges. From 20 Dec 1993 to 7 Feb 1994, author has done Solo trekking in Sahyadri mountains.
₹480.00 Original price was: ₹480.00.₹460.00Current price is: ₹460.00.
Out of stock
Email when stock available
Description
२० डिसेंबर १९९३ ते १७ फेब्रुवारी १९९४ या कालावधीत श्रीपाद हिर्लेकर यांनी ही तब्बल ६० दिवसांची सह्यगीरीयात्रा एक्ट्यानेच केली. या सह्यागीरीयात्रेला ते ट्रेक न म्हणता आनंदयात्रा असे म्हणतात . ही यात्रा करायला हिर्लेकर यांना पर्यावरण, संशोधन, सामाजिक, ऐतिहासिक असे कोणतेच कारण नको होते, हवी होती ती फक्त आनंदयात्रा! आणि ही आनंदयात्रा करताना काढलेली अप्रतिम स्केचेस पुस्तकाच्या प्रत्येक पानावर आहेत. प्रत्येक स्केच हे seeing is believing या तत्त्वाचा अवलंब करून काढलेले आहे. पुस्तकातील सर्व स्केचेस ही एकाच दृष्टीकोनाने सर्व पर्स्पेक्टिव न पाहता रिले रेसप्रमाणे ती टप्प्याटप्प्याने काढलेली आहेत. आज उपलब्ध असणारे गुगल अर्थ, एरिअल फोटोग्राफी असे कुठलेही तंत्रज्ञान न वापरता प्रतापगडचे स्केच काढलेले आहे. लेखक प्रांजळपणे या गोष्टीची कबुली देतो की हे पुस्तक दहा – पंधरा वर्षापूर्वीच बाजारात यायला हवे होते कारण यातील बरेचशे संदर्भ आणि माणसे सुध्दा बदलून गेल्यामुळे वीस वर्षात रिमोट गोष्टी या रिमोट न राहिल्याने तसे हे पुस्तक कालबाह्य झाले आहे. त्याकाळात जी ढोर मेहेनत करून नकाशे आणि माहिती ज्या दर्जा पर्यंत पोहोचविली, ते सर्व आता गुगल, ब्लॉग मुळे कवडीमोल ठरले आहे. कदाचित मागच्या पिढीच्या नॉस्टल्जियाची गरज हे पुस्तक भागवू शकेल असे लेखकाला वाटते.
हिर्लेकर म्हणतात साठ दिवसांचा हा ट्रेक करताना एक क्षणभर सुध्दा ट्रेक सोडायचा विचार कधी मनाला शिवला नाही, पण त्याचे पुस्तकात रुपांतर करताना…. दोन प्रकाशकांकडून धुडकावल्यानंतर झक मारून पुस्तक स्वतः प्रकाशित करावे का हा विचार मनात आला. या विषयावर आतापर्यंत इतकी पुस्तके आली आहेत की आपण उगाचच हा उपदव्याप तर करत नाही ना अशी संभ्रमावस्था निर्माण झाली. काहीही असले तरी प्रत्येक ट्रेकरने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे. पुस्तक वाचताना ते प्रसंग, ते किल्ले, त्या जागा जिवंतपणे आपल्या समोर येतात. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच अशा कळसुबाई शिखराच्या शिडीवर असलेला मण्यार आणि त्यानंतर शिखरावर केलेला मुक्काम हे वर्णन वाचताना अंगावर शहारा येतो तर वासोट्याच्या जंगलातील एकाकी घरातील धनगराने केलेला पाहुणचार वाचताना डोळ्यात टचकन पाणी येते. रूढ अर्थाने सह्याद्रीतील भटकंती करण्यासाठी हे पुस्तक उपयोगाचे नाही, तर सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील किल्ले, सुंदर पण तितकाच रौद्र निसर्ग आणि तेथील माणसे अनुभवण्यासाठीचे हे पुस्तक आहे. यातील वर्णन बरेच ठिकाणी आपल्या स्वतःच्याच अनुभवाचे आहे असे वाटते, त्यामुळे सह्याद्रीत भटकणाऱ्या प्रत्येकाच्या संग्रही हे पुस्तक असायलाच हवे!
Additional information
Weight | 760 g |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Book Author | |
First Edition | 2013 |
Format | Hardcover |
Language | Marathi |
Pages | 309 |
You may also like…
-
Trek the Sahyadris
Book Author ₹525.00Original price was: ₹525.00.₹425.00Current price is: ₹425.00.
Related products
-
Out of stock
₹520.00Original price was: ₹520.00.₹470.00Current price is: ₹470.00. -
₹260.00Original price was: ₹260.00.₹230.00Current price is: ₹230.00.
Category
- All Forts (114)
- Archaeology (117)
- History (617)
- Kids (48)
- Language (24)
- Mughal (46)
- Nature (183)
- Other Books (109)
- Peshwa (192)
- Region (173)
- Sambhaji (37)
- Shivaji (248)
- Short Trips (44)
- Temples (94)
- Trekking (19)