Samarangan Sutradhara – समरांगण सूत्रधार

An important book that successfully preserves the legacy of the ancient Indian knowledge tradition and brings it down to us is Samarangan Sutradhara. The famous king Bhojdev of the Parmar dynasty composed this book in the eleventh century AD. Various subjects such as architecture, urban planning, various types of temple architecture, idolatry have been discussed in this book.
Author Prasad Sevekari has given a brief introduction to this book. Instead of giving only the original Sanskrit verse and its translation, he has given a summary of each topic.

Book Author

Category:

Original price was: ₹300.00.Current price is: ₹270.00.

In stock

Description

प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेचा वारसा समर्थपणे जतन करून आपल्यापर्यंत पोहोचविणारा एक महत्वाचा ग्रंथ म्हणजे समराङ्गगणसूत्रधार. परमार घराण्यातील ख्यातकीर्त राजा भोजदेव याने इसवी सनाच्या अकराव्या शतकात या ग्रंथाची निर्मिती केली. वास्तुरचना, नगररचना, विविध प्रकारच्या मंदिरस्थापत्य शैली, मूर्तिविधान अशा अनेकविध विषयांचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे.
लेखक श्री. प्रसाद सेवेकरी यांनी प्रस्तुत पुस्तकात भोजदेवाच्या या ग्रंथाचा साक्षेपाने परिचय करून दिला आहे. मूळ संस्कृत श्लोक आणि त्याचे भाषांतर इतकेच देण्याऐवजी प्रत्येक विषयाचा त्यांनी सारांश दिला आहे. मात्र हे करताना मूळ ग्रंथातील माहितीशी पूर्णपणे प्रामाणिकता राखली गेली आहे. भरपूर छायाचित्रे आणि रेखाकृती दिल्या असल्याने स्थापत्यासारखा सर्वसामान्यांना काहीसा अवघड वाटणार विषयही सुलभतेने समजण्यास मदत झाली आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी या सर्वांनाच हे प्रकाशन उपयुक्त ठरेल, यात शंका नाही.

Additional information

Weight 310 g
Dimensions 18 × 2 × 24 cm
Book Author

First Edition

2023

Format

Paperback

Language

Marathi

Pages

152

ISBN

978-81-1955419-9-7