Badaltya Punyachi Badalti Hirwai – बदलत्या पुण्याचे बदलती हिरवाई

Prof. Madhav Savale’s poem, “Punyechi Kahani – Kalchi An Aajchi” (The Story of Pune – Past and Present), vividly portrays the changing face of the city; the poem captures the transformations within Pune with remarkable aptness. These changes inevitably altered the lush greenery that once defined the city’s scenic landscape. Dr. Vinaya Ghate’s book, Badaltya Punyachi Badalti Hirwai (The Changing Greenery of a Changing Pune), is sure to appeal to nature lovers, as it eloquently details these transformations, the surviving green heritage, and the flora consciously nurtured by citizens of Pune.

Book Author

Category: Tags: ,

Original price was: ₹350.00.Current price is: ₹310.00.

In stock

Description

आटपाट नगर होतं | विद्येचं माहेरघर होतं ||
सह्याद्रीच्या कुशीत होतं | टेकड्यांच्या मुशीत होतं ||
मुळा-मुठा निर्मळ होती | गोड पाण्याची चंगळ होती ||
काळ्या मातीत कस होता | वरण भात बस्स होता ||
निसर्गाचं देणं होतं | पाताळेश्वरी लेणं होतं ||
नाव त्याच पुणं होतं | खरंच काही उणं नव्हतं ||

पण परंतु किन्तु….

औद्योगिक क्रांती झाली | पुण्यामध्ये पिंपरी आली ||
कारखाने धूर ओकू लागले | पुणेकर सारखे खोकू लागले ||
पुण्याची आय-टी पंढरी झाली | तज्ञांची मांदियाळी आली ||
उंच इमारतींचे पीक आले | शेती करणे अहित झाले ||
टेकड्यांवर हातोडा पडला | सह्याद्रीच तेवढा कळवळला ||
मुळा-मुठा सुकून गेली | सांडपाण्याने बहरुन आली ||
रस्ता गाड्यांमध्ये हरवत गेला | चालताना श्वास कोंडत गेला ||
‘युज अँड थ्रो’ प्रतिष्ठेचे झाले | जागोजागी ढीग कचऱ्याचे आले ||
एकेकाळची पुण्य नगरी | होतेय आता सिमेंट नगरी ||

प्रा. माधव सावळे यांच्या “पुण्याची कहाणी – कालची अन् आजची” या कवितेत बदलत्या पुण्याचे चित्र रेखाटले आहे त्यातील या काही महत्वपूर्ण ओळी. कवितेत पुण्यनगरीतील बदल किती समर्पकपणे मांडले आहेत. हे बदल होताना निसर्गरम्य पुण्याच्या हिरवाईतही मोठ्या प्रमाणात बदल झाले. झालेले बदल, टिकलेले हिरवे वारस आणि चोखंदळ पुणेकरांनी नव्याने आणि जाणीवपूर्वक जोपासलेली वनस्पतीसंपदा विषद करणारे ‘बदलत्या पुण्याचे बदलती हिरवाई’ हे डॉ. विनया घाटे यांनी लिहिलेले पुस्तक निसर्गप्रेमींच्या पसंतीस उतरेल याची खात्री वाटते.

Additional information

Weight 200 g
Dimensions 14 × 2 × 21.5 cm
Book Author

First Edition

2026

Format

Paperback

Language

Marathi

Pages

179

ISBN

978-93-90129-98-0

You may also like…